धाराशिव / प्रतिनिधी-

धाराशिव दिल्ह्यात 12 वर्षीय व 17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर नराधमांनी लैंगिक अत्याचार केल्याची घटना  घडली आहे. 

या प्रकरणी पिडीतेच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून संबंधितांच्या विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धाराशिव जिल्ह्यातील एका गावातील एक 12 वर्र्षीय मुलगी   तीच्या घरात होती. त्यावेळी गावातील एका तरुणाने त्या मुलीवर लैंगीक अत्याचार करुन त्याचे व्हिडीओ चित्रीकरण केले. तसेच घडल्या प्रकाराची कोठे वाच्यता केल्यास तुला ठार मारुन टाकीन, अशी धमकी दिली. या प्रकरणी पिडीतेच्या आईने दि.24 मार्च रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम-  376 (3), 377 सह पोक्सो कायदा कलम 4, 6, 8, 10, 12, 14  सह आयटी अ‍ॅक्ट कलम 66 ई अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

दुसºया घटनेत धाराशिव जिल्ह्यातील एका गावातील एक 17 वर्र्षीय मुलगी   तीच्या घरात असताना शेजारच्या गावातील एका तरुणाने त्या मुलीस फोन करुन शेतात बोलावून घेतले. शेतात तीच्यावर लैंगीक अत्याचार केला. तसेच घडल्या प्रकाराची कोठे वाच्यता केल्यास तुला ठार मारुन टाकू अशी धमकी दिली. या प्रकरणी पिडीतीने दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम-  376, 376 (1), 506 सह पोक्सो कायदा कलम 3, 4, 6,  सह कलम 3(2) (व्हिए) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.


 
Top