धाराशिव / प्रतिनिधी-

महाराष्ट्र अ‍ॅन्ड गोवा बार कौन्सिलच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल अ‍ॅड.मिलिंद पाटील यांचा महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला.

  अ‍ॅड.पाटील यांच्या कुशल कार्यशैलीचा बार कौन्सिलला मोठा फायदा होईल असे गौरवोदगार यावेळी समितीचे मार्गदर्शक धनंजय शिंगाडे यांनी काढले. यावेळी समितीचे मार्गदर्शक धनंजय शिंगाडे, माजी उपनगराध्यक्ष तथा समितीचे अध्यक्ष राजाभाऊ बागल,सल्लागार सुभाष (नाना) पवार, आबासाहेब खोत, भाऊसाहेब उंबरे, नंदकुमार शेटे, लक्ष्मण माने, शरणम् शिंगाडे,  रावसाहेब शिंगाडे, यशवंत शिंगाडे, प्रशांत काबळे आदी उपस्थित होते.

 
Top