धाराशिव / प्रतिनिधी-

  वित्तीय वर्ष 2022 -2023 या वर्षातील उस्मानाबाद जिल्हयातील सर्व आहरण व संवितरण अधिकारी यांचे कार्यालयातील बीडीएसवर प्राप्त झालेले अनुदान हे दि. 31 मार्च 2023 पर्यत आहरित होणे गरजेचे आहे. तसेच सदरिल देयकाचे अनुदान हे व्यपगत होऊ नये म्हणून दि. 25 व 26 मार्च 2023 या शासकीय सुट्टीच्या दिवशी जिल्हा कोषागार कार्यालय तसेच आपले अधिनस्त सर्व उपकोषागार कार्यालये चालू ठेवणे आवश्यक आहे.

  उस्मानाबाद जिल्हयातील सर्व आहरण व संवितरण अधिकारी यांचे कार्यालयातील देयके  आहरित होण्याकरिता दि.25 व 26 मार्च 2023 या दोन सुट्टीच्या दिवशी जिल्हा कोषागार कार्यालय व आपले अधिनस्त सर्व उपकोषागार कार्यालय दिवसभर शासकीय वेळेत चालू ठेवण्यात यावीत, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी दिले आहेत.


 
Top