आमदार-खासदाराच्या पेन्शनवर टिका 

धाराशिव / प्रतिनिधी- 

एकच मशिन जुनी पेन्शन या व इतर मागणींसाठी विविध कर्मचारी संघटनेने मंगळवार दि. १४ मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोर्चाचे नंतर सभेत रूपातर झाले. यावेळी अनेक वक्त्यांनी आम्ही ३० वर्ष काम करून देखील आम्हाला पेन्शन नाही तर अामदार-खासदार पाच वर्ष काम करून त्यांना मात्र पेन्शन कांही अामदार-खासदारांनी पाच पिढ्या बसूजन खातील एवढी कमई असताना देखील त्यांना पेन्शन चालूच आहे. अशा स्वरूपात मोर्चा मधील कांही वक्त्यांनी अामदार-खासदारांच्या पेन्शनवर संताप व्यक्त करत टिका केली. तर कांही शिक्षक पोत-कवड्यांची माळ, संभळ घेऊन गांेधळ्यांच्या वेशात सहभागी झाले होते. 

 तुळजाभवानी क्रीडा संकुल येथुन सुरू झालेला हा मोर्चा डा. बाबासाहेब आंबेडकर चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धडकला. यावेळी अनेक वक्त्यांनी सरकारने जाहीर केलेल्या पेन्शन विरोधी योजनेला कडाडून विरोध केला. या सभेत कांही वक्त्यंानी अामदार-खासदार यांच्या पेन्शन बाबत  एनपीएस लागू करा, अशी मागणी केली. त्यानंतर मोर्चाकर्त्यांच्या वतीने पेन्शनच्या मागणीसह इतर ८ मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले. यावेही राज्य सरकारी कर्मचारी मध्यवती संघटनेचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत शिंदे, सचिव बालाजी पांचाळे, शिक्षक संघटनेचे बशीर तांबोळी, यशवंत डोलारे, बालाजी वाघमारे आदी उपस्थित होते. मोर्चामध्ये सहभागी सशिक्षकांची संख्या मोठ्या प्रमाणात होती. आजच्या मोर्चात महसूल, आरोग्य विभाग आदी ४१ सरकारी कर्मचारी संघटना सहभागी असल्याचे सांगण्यात आले. 

मोर्चा फेल ची चर्चा 

कर्मचारी संघटनेच्या नेत्यांनी पत्रकार परिषदेमध्ये १० हजाराच्या कम्रचारी मोर्चाात सहभागी होतील अशी संख्या सांगितली होती. या संदर्भात पोलिस विभागाला मोर्चात किती लोंक सहभागी आहेत या संदर्भात विचारले असता, ४ ते ५ हजार कर्मचारी असल्याचे सांगितले. मोर्चात उमरगा, लोहारा, तुळजापूर, धाराशिव, कळंब, वाशी भूम,परंडा आठ ही तालुक्यातील कर्मचारी कमी अिधक प्रमाणात दिसून आले.  

 पगारातील तफावत

मोर्चामध्ये कांही कर्मचाऱ्यांना बोलते करण्याचा प्रयत्न केल्यानंतर त्यांनी पगार वाढीचा मोर्चा असल्याचे सांगितले. जिल्हा परिषद शिक्षकांना ६५ हजाराच्या वर पगार तर आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना ३० ते ३५ हजाराची पगार यावर ही कांही कर्मचाऱ्यांनी मते व्यक्त केली. यावर कांही शिक्षक नेत्यांनी आमच्यातील कांहीजण  विनाअनुदान, विनावेतन तीन तीन-चार-चार वर्ष काम करून  जि.प. शाळेत नौकरी लागल्यानंतर आता कुठे पेमंेट मिळत असल्याचे सांगितले. 

 
Top