धाराशिव /प्रतिनिधी

 राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण तथा पालकमंत्री प्रा.डॉ.तानाजीराव सावंत धाराशिव (उस्मानाबाद) यांच्या अध्यक्षतेखाली सोमवार, दि.27 मार्च 2023 रोजी सकाळी 10.00 वाजता भूम येथे जनता दरबारचे आयोजन करण्यात आले आहे.

 तरी भूम तालुक्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी या जनता दरबाराचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. यावेळी जिल्ह्यातील सर्व विभाग प्रमुखांनी आपल्या विभागाच्या अद्यावत माहितीसह स्वत: उपस्थित राहावे. तसेच मा.पालकमंत्री यांच्या पूर्वपरवानगी शिवाय कोणीही गैरहजर राहणार नाही तसेच पूर्वपरवानगी‍ शिवाय रजेवर जाणार नाहीत याची सर्वांनी नोंद घ्यावी, असे निर्देशही देण्यात आले आहेत.


 
Top