धाराशिव / धाराशिव :- 

 शेतकºयांच्या विविध मागण्यासाठी जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जिल्हा कार्याध्यक्ष संजय पाटील दुधगावकर यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी (दि.11) सकाळी 10 वाजता रास्ता रोको आंदोलन करण्यात येत आहे. धाराशिव तालुक्यातील ढोकी साखर कारखाना चौकामध्ये हे आंदोलन करण्यात येणार आहे. याबाबत गुरुवारी (दि.९) जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे. या आंदोलनात शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन दुधगावकर यांनी केले आहे.

या निवेदनात दुधगावकर यांनी म्हंटले आहे की, जिल्ह्यातील शेतकरी आसमानी आणि सुलतानी संकटामध्ये मागील दोन वषार्पासून अडचणीत आला आहे. शासनाला वेळोवेळी केलेल्या मागण्यांसदर्भात कसलीही ठोस कारवाई न केल्याच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात येणार आहे. यावेळी शासनाने हरभरा 30 खरेदीकेंद्र त्वरीत मंजूर करुन चालु करावीत तसेच हेक्टरी 15 क्विंटल हरभरा उत्पादकता जाहीर करावी. शासनाने कांद्याला रुपये 1000 प्रतिक्विंटल अनुदान मंजूर करुन हमीभाव खरेदी केंद्र त्वरीत चालु करावीत. 2022 चा पिकीविमा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सरसगट द्यावा.सततच्या पावसामुळे झालेले सोयाबीन नुकसान भरपाईचे रुपये 222 कोटी त्वरीत शेतकऱ्यांना मिळालीच पाहिजे. टेंभूर्णी-लातूर रस्ता चौपदरीकरण मंजूर करुन त्याचे काम त्वरीत चालु करावे. येडेश्वरी मंदीर ते बार्शी रोड 3.5 कि.मी रस्त्याचे डांबरीकरण मंजूर करुन त्याचे काम त्वरीत चालु करण्यात यावे. प्रस्तावीत 37 टक्के वीज दरवाढ रद्द करुन शेतकऱ्यांचे सक्तीचे वीजबील वसूली थांबवावी. गोपीनाथ मुंडे अपघात विमा मंजूर करुन मृत शेतकरी कुटूंबांना विमा त्वरीत वाटप करावा. या मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येत आहे. आंदोलनात शेतकºयांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन दुधगावकर यांनी केले आहे.


 
Top