मागील अडीच वर्षात विस्कळीत झालेल्या अर्थव्यवस्थेला नव संजीवनी देण्याचे काम उपमुख्यमंत्री तथा राज्याचे अर्थमंत्री ना. देवेंद्रजी फडणवीस यांनी आज मांडलेल्या पंचामृत अर्थसंकल्पाच्या माध्यमातून करण्यात आले आहे.अशी प्रतिक्रिया  भाजप आ.राणाजगजितसिंह पाटील यांनी व्यक्त  केली आहे.

डॉक्टर साहेबांच्या प्रयत्नातुन जिल्ह्यात  सिंचन, वीज,रस्ते आदी पायाभूत सुविधांची निर्मिती झाल्यानंतर पुढील झेप घेण्यासाठी आवश्यक असणाऱ्या अनुषंगिक बाबीसाठी महाविकास आघाडीच्या काळात पाठपुरावा करून कांहीच पदरात पडत नव्हते. आता मात्र देवेंद्रजीनीं अर्थसंकल्पातून धाराशिव साठी अपेक्षित सर्व गोष्टींची सुरुवात केली असंच म्हणावं लागेल.असे सांगून आ.पाटील यांनी 

कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्प, मराठवाडा वॉटर ग्रीड,सोलापूर-तुळजापूर-धाराशिव रेल्वे मार्गासाठी व शासकीय वैद्यकीय महाविद्यालया साठी निधी,या महत्वाच्या विषयांना न्याय देत जिल्ह्यासाठी शक्तीपीठ महामार्गाची भेट देऊन त्यांनी एकप्रकारे जिल्ह्याच्या अमृतकाळाचा प्रारंभ केला आहे. मागील अडीच वर्षात धाराशिव जिल्ह्यातील थांबलेल्या विकासाला प्रचंड चालना देण्याचे काम उपमुख्यमंत्री तथा राज्याचे अर्थमंत्री ना. देवेंद्रजी फडणवीस यांनी आज मांडलेल्या ‘पंचामृत’अर्थसंकल्पाच्या माध्यमातून करण्यात आले आहे. जगाचा पोशिंदा असलेल्या बळीराजाला केंद्र सरकार प्रमाणेच रुपये ६००० प्रति वर्ष शेतकरी सन्मान योजनेद्वारे देण्यासह केवळ एक रुपयात पिक विमा देण्याचा क्रांतिकारी निर्णय शिंदे - फडणवीस  सरकारने घेतला आहे. आशा, अंगणवाडी सेविका व मदतनीस, गटप्रवर्तक, शिक्षण सेवक, कोतवाल यांच्या मानधनात वाढ केली आहे. संजय गांधी व श्रावण बाळ निराधार योजनांच्या मानधनात देखील रुपये ५०० ची वाढ करण्यात आली आहे. जनभागीदारी असलेला हा अर्थसंकल्प सर्वार्थाने परिपूर्ण असून प्रत्येक घटकाला न्याय देण्याचे काम शिंदे - फडणवीस सरकारने केला आहे.अशीच प्रतिक्रिया भाजप जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांनी व्यक्त  केली आहे

 
Top