धाराशिव / प्रतिनिधी-

मराठवाडा वॉटर ग्रीड कृष्णा-खोरे सिंचन योजना आिण िनम्न तेरणा-सिना कोळेगांव व उजनी प्रकल्प एकमेकांना जोडून जिल्हयाची पिण्याच्या पाण्याची व उर्वरीत पाणी शेतीसाठी वापरण्यात येईल, त्यामुळे येत्या कांही वर्षांत जिल्हयाची पाण्याची समस्या कायम मिटवणार आहे, अशी माहिती भाजपचे माजी मंत्री  तथा अामदार राणाजगजितसिंह पाटील यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली. 

१८ मार्च रोजी सांयकाळी घेण्यात आलेल्या या पत्रकार परिषदेस नितीन काळे, दत्ता कुलकर्णी, सुनिल काकडे, नेताजी पाटील, राजसिंहराजे निंबाळकर उपस्थित होते. पुढे माहिती देताना अामदार राणाजगजितसिंह पाटील यांनी डॉ.पद्मसिंह पाटील यांनी कृष्णा-खोरे मराठवाडा सिंचन प्रकल्पास १९९९ ला मंजूरी मिळवुन घेतली होती. महाराष्ट्र सरकार ने नुकत्याच मांडलेल्या अर्थसंकल्पामध्ये या योजनेसाठी ११ हजार ६२६ कोटीची मान्यता दिली आहे. शिंदे-फडणवीस सरकारमुळे धाराशिव शहराचे नामांतर होण्यास मोठ्या प्रमाणात मदत झाली. तर सोलापूर-तुळजापूर-धाराशिव रेल्वे मार्गांसाठी ५० टक्के वाटा राज्य सरकार ने मंजूर केला आहे. जिल्हयातून जाणाऱ्या नागपूर ते गोवा या महामार्गामुळे तुळजापूरसह जिल्हयाला मोठ्या प्रमाणात लाभ होणार आहे. 

रेल्वे स्थानक उभारण्याची प्रक्रिया सुरू 

सोलापूर-तुळजापूर-धाराशिव रेल्वे मार्गांचे काम महारेल मार्फत गतीने होणार आहे. त्यामुळे येत्या कांही महिन्यात तुळजापूर येथे रेल्वे स्थानक उभारण्याची प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे, असे सांगून अामदार  पाटील यांनी धाराशिवच्या मेडीकल कॉलेजसाठी सिंचन विभागाने २० एकर जागा दिली आहे. तर उर्ववरत आयटीआयची ३० एकर जागे संदर्भात लवकरच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत बैठक होऊन जागेचा प्रश्न निकाला निघेल, असेही अामदार पाटील यांनी सांगितले.

 
Top