तुळजापूर / प्रतिनिधी-
तिर्थक्षेञ तुळजापूर शहरातील पाणीपुरवठा पाईप लाईन फुटाफुटीमुळे सातत्याने विस्कळीत होत असल्याने परिणामी शहरात पाणीटंचाई निर्माण होत असल्याने पाणीपुरवठा वितरण व्यवस्था काळजीपूर्वक हातळण्याची मागणी होत आहे.
शनिवारी शहरातील फिल्टर केंद्र जवळ नवी व जुनी पाईप लाईन चालु असताना ऐकमेकांना क्राँस कनेक्शन होवुन जुनी पाईप लाईन फुटल्याने शहराला रविवारी होणारा पाणीपुरवठा बंद झाला.लवकर पाईपलाईनची दुरूस्ती करून शहरात पाणीपुरवठा वेळेवर नाही केला तर तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.