धाराशिव / प्रतिनिधी-

हिंदुस्थानचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तिथीनुसार जयंतीनिमित्त (दि.10) शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात दीपोत्सव सोहळा साजरा करण्यात आला. शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या सभोवताली शेकडो दीप प्रज्वलित केल्याने चौकाचा परिसर सुशोभित झाला होता.

 शहरातील क्षत्रिय कुलावंतंस महिला पथकाच्या वतीने  छत्रपती शिवरायांची तिथीनुसार जयंती पाळणा, दीपोत्सव आशा पारंपरिक कार्यक्रमाने साजरी करण्यात येते. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही छत्रपती शिवाजी महाराज चौकात दीपोत्सवाचा उपक्रम राबविण्यात आला.  सायंकाळी छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याभोवती दीप प्रज्वलित करण्यात आले. तसेच आकर्षक रांगोळी काढण्यात आली होती.  यावेळी महिला व मुलींनी छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय जिजाऊ जय शिवराय असा जयघोष करत छत्रपती शिवरायांना अभिवादन केले.

 दीपोत्सवासाठी क्षत्रिय कुलावंतंस महिला पथकाच्या अध्यक्ष सौ.सुषमा पाटील, कार्याध्यक्ष सौ.शैला दसपुते, सदस्य सौ.शोभा घोडके, सौ.ज्योती पवार, सौ.बालिका सावंत यांच्यासह महिला व इतर मुलींनी परिश्रम घेतले.  


 
Top