धाराशिव / प्रतिनिधी-

 निती आयोगाच्या आकांक्षित जिल्हा कार्यक्रमाअंतर्गत जिल्हयास 2021 मधील प्राप्त बक्षीस रक्कमेतुन मंजुर आराखडयानुसार बीबीएफ/ व 24X24X4 मी. आकारमानाचे वैयक्तीक शेततळे ( अस्तरीकरण  व कुंपनासह ) या घटकांचा लाभ घेणेकरीताच्या  पुढील प्रमाणे घटक निहाय अर्ज दिनांक 17 मार्च 2023  रोजीपर्यंत मागविण्यात येत आहेत.

  बी.बी.एफ  - लाभार्थींचे विहित नमुन्यातील अर्ज ( अर्जामधील अटींची पुर्ततेसह ) तालुका कृषि अधिकारी कार्यालय यांचेकडे सादर करावेत.बी.बी.एफ हे वैयक्तीक शेतकरी,शेतकरी गट व FPO  (शेतकरी उत्पादक कंपनी) यांना लाभ घेता येईल.  तसेच सन 2020 मधील प्राप्त बक्षीस रक्कमेतील प्राप्त अर्जापैकी प्रलंबित यादीत असलेले लाभार्थींना प्रथम प्राधान्य व लक्षांकापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास  नोंदणीकृत FPO ,शेतकरी गट व वैयक्तीक शेतकरी असे प्राधान्य देण्यात येईल. वैयक्तीक लाभार्थांमध्ये  सिमांत शेतकरी (  1 हेक्टर आतील ), लहान शेतकरी (1 ते 2 हेक्टर ) व इतर ( 2 हेक्टर पेक्षा जास्त )   शेतकरी  यामध्येही अनुसुचित जाती,जमाती व महिला शेतकरी यांना प्राधान्य देण्यात येईल.सदर घटक 60 टक्के अनुदानावर किंवा रक्कम रु.35000 च्या प्रति घटक मर्यादेत असेल.  लक्षांकापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास  लक्की ड्रॉ पध्द्तीचा अवलंब केला जाईल. घटकांचे अक्षांश/रेखांशसह मोका तपासणी झाल्यानंतरच लाभार्थींना अनुदान डी.बी.टी पध्द्तीने त्यांच्या बँक खातेवर अनुदान देण्यात येईल.24X24X4 मी. आकारमान  - वैयक्तीक शेततळे ( अस्तरीकरण  व कुंपनासह ) -लाभार्थींचे विहित नमुन्यातील अर्ज  ( अर्जामधील अटींची पुर्ततेसह ) तालुका कृषि अधिकारी कार्यालय यांचेकडे सादर करावेत.वैयक्तीक शेततळे हे वैयक्तीक शेतकरी ज्यांचेकडे फलोत्पादन पिके (फळबाग/फुले/भाजीपाला इ. )  अशा शेतकऱ्यांना प्रथम प्राधान्य, वैयक्तीक लाभार्थांमध्ये  सिमांत शेतकरी (  1 हेक्टर आतील ), लहान शेतकरी (1 ते 2 हेक्टर ) व इतर ( 2 हेक्टर पेक्षा जास्त )   शेतकरी  यामध्येही अनुसुचित जाती,जमाती व महिला शेतकरी यांना प्राधान्य देण्यात येईल.सदर घटक 90 टक्के अनुदानावर रक्कम रु.1,51,200/- च्या प्रति घटक मर्यादेत असेल.  लक्षांकापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास  लक्की ड्रॉ पध्द्तीचा अवलंब केला जाईल. ज्या जागी शेततळे खोदण्यात येणार आहे त्या जागेचा खोदकामा पुर्वीचा, शेततळे खोदकाम व अस्तरीकरण व पाणी भरणे व कुंपन अशा प्रकारे शेततळे पुर्ण झाल्यानंतर शेतकरी/शेतकरी प्रतिनिधी समवेत अक्षांश व रेखांशासह फोटो घेतल्यांनतर मापन पुस्तिकेत नोंद घेवूनच  लाभार्थींना डी.बी.टी पध्द्तीने त्यांच्या बँक खातेवर अनुदान  देण्यात येईल.


 
Top