धाराशिव / प्रतिनिधी-

अनुजाती.वि.जा.भ.ज,इमाव व विमाप्र प्रर्वगातील व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेवू इच्छिणारे विदयार्थी जात प्रमाणपत्र पडताळणी करिता समितीकडे विहित कालमर्यादेत अर्ज सादर करत नाहीत.त्यामुळे असे विदयार्थी शैक्षणिक तसेच इतर लाभापासून वंचित राहतात. उपरोक्त प्रवर्गातील 11 वी व 12 वी विज्ञान शाखेतील विदयार्थ्यांचे जात प्रमाणपत्र पडताळणीचे प्रस्ताव दि.31 मार्च 2023 अखेर ऑनलाईन भरुन प्रस्ताव समक्ष या कार्यालयास सादर करावेत. जेणेकरुन विदयार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र पुढील शिक्षणासाठी वेळेत मिळेल.

 असे आवाहन जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे, अध्यक्ष डॉ.बी.जी.पवार यांनी केले आहे. 

 
Top