खोके वाटुन आलेल सरकार अर्थसंकल्पात काय दिवा लावणार हे अगोदरपासून माहित होतच अगदी तसच समोर आले आहे. जिल्ह्याच्या दृष्टीने तर काहीच मिळाले नसल्याने अत्यंत निराशाजनक स्थिती निर्माण झाल्याचे खासदार राजेनिंबाळकर यांनी सांगितले. यापूर्वीच  रेल्वेसाठी मंजुर व निधीची तरतुद असताना परत गिरवणी करून सदरचा  उल्लेख  अर्थसंकल्पात  केला आहे. शेतकऱ्यांसाठी आता राज्य सरकार सन्मान निधी देणार असल्याचे सांगितल आहे. पण केंद्राकडून मिळणार्‍या सन्मान निधी सहा - सहा महिने मिळत नाही. त्याचे निकष अटी घालुन शेतकरी संख्या वरचेवर कमी होत आहे, मग त्याच पक्षाचे हे सरकार वेगळं काय करणार आहे. सततच्या पावसाच्या नुकसानीचे अनुदान न दिलेले सरकार शेतकऱ्यांसाठी विविध घोषणा करते तेव्हा ती फक्त जुमलेबाजी असल्याचे समोर येत आहे अस राजेनिंबाळकर यानी म्हटले आहे.  रोजगारनिर्मिती करुन तरुणांच्या हाताला काम देण्याकडे तर साफ दुर्लक्ष केले आहे. विम्यासाठी आता एक रुपया शेतकऱ्यांकडुन घेतला जाणार पण विमा कंपनीला वठणीवर आणण्याचे धारिष्ट्य सरकारने का दाखवले नाही असा प्रश्नही खासदारांनी केला आहे. जिल्ह्याच्या सिंचनासाठी देखील काहीच केलेले दिसत नाही हे दुर्देवी आहे. नैसर्गिक शेतीसाठी मोठी तरतुद केल्याची योजना तर हास्यास्पद आहे. उत्पादीत शेतीमाल कवडीमोलाने विकायची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे तो प्रश्न सोडुन हे आभासी चित्र तयार करण्याचा सरकारचा प्रयत्न हास्यास्पद असल्याचे ओमराजे यानी म्हटले आहे.

 
Top