धाराशिव / प्रतिनिधी-

 केंद्र व राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार योजना,  श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना व इंदिरागांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ योजनेतील लाभार्थ्यांना अवाहन करण्यात येते की, केंद्र पुरस्कृत व राज्य पुरस्कृत सर्व योजनांचे PFMS  प्रणालीव्दारे अनुदान वाटप करण्यासाठी केंद्र शासनाने निर्देश दिलेले आहेत.  तसेच यापुढे राज्य पुरस्कृत  योजनांचेही अनुदान PFMS  प्रणालीव्दारे वाटप करण्याच्या अनुषंगाने पोर्टलवर लाभार्थ्यांची माहिती अपडेट करण्यासाठी देखील राज्य शासनाकडून सुचना निर्गमीत केल्या आहेत.  उस्मानाबाद तालुक्यातील   18615 लाभार्थ्यांचे खाते जिल्हा मध्यवर्ती सह. बँकेत आहेत. जिल्हा मध्यवर्ती बँकेतील लाभार्थ्यांचा तपशिल PFMS  प्रणालीवर मंजूरीसाठी तांत्रिक अडचणी येत आहेत.

 त्याअनुषंगाने पोर्टलवर  लाभार्थ्यांचे बँक खाते क्रमांक,आधार क्रमांक, आयएफसी कोड, मोबाईल नंबर इत्यादी माहिती अचुक भरता यावी व लाभार्थ्यांना अनुदान सुरळित रित्या, नियमीत व वेळेत मिळण्याच्या दृष्टीने लाभार्थ्यांचे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील खातेधारक  यांचे आपल्या इंडियन पोस्टल पेमेंट बँक म्हणजेच जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये खाते उघडण्यात यावेत. जेणेकरुन आपल्याला वेळेवर अनुदान वितरीत करता येईल.

 करीता जिल्हा मध्यवर्ती सह. बँकेतील खाते धारकांनी, संगायो, श्रावणबाळ व वृध्दापकाळ योजनेतील लाभार्थी यांनी  आपल्या गावातील किंवा जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन नव्याने खाते काढून घ्यावेत असे आवाहन करण्यात येते.

 तसेच ए.पी.एल. केशरी शिधापत्रिका धारक शेतकरी अन्नधान्य ऐवजी प्रती सदस्य रु. 150 अनुदान खात्यामध्ये जमा करण्याबाबत अन्न व नागरी पुरवठा विभागाव्दारे निर्णय घेण्यात आलेला आहे.  त्यानुसार महिला कुटूंबाच्या नव्याने असलेल्या बँक खात्यात अनुदान जमा करण्याबाबत निर्देश आहेत.  याकरीता सदर शेतकरी योजनेतील महिला लाभार्थ्यांचे बँक खाते उघडण्यात आलेले नसल्यास त्यांनीही आपल्या गावातील किंवा जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये  जाऊन खाते उघडण्यात यावे व सदर खात्याचा तपशिल व कुटूंबातील सर्व संस्थांचे आधारकार्ड आपल्या स्वस्तधान्य दुकानदार यांचेकडे दि. 15 मार्च 2023 पूर्वी सादर करावे असे आवाहन करण्यात येते.


 
Top