तुळजापूर / प्रतिनिधी-

यशवंतराव चव्हाण महाविद्यालय तुळजापूर येथील करिअर गायडन्स कौन्सिलिंग सेल आणि परम कौशल्य प्रशिक्षण इंडिया लि. औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने महिंद्रा अँड महिंद्रा कंपनी प्रायव्हेट लिमिटेड चाकण पुणे साठी रोजगार मेळाव्याचे महाविद्यालयामध्ये आयोजन करण्यात आले.  या रोजगार मेळाव्यात महाविद्यालयाचे 50 पेक्षा जास्त  तरुण सहभागी झाले होते त्यातील 37 विद्यार्थी महिंद्रा अँड महिंद्रा कंपनी प्रा. लि. मध्ये निवड झाले. बालाघाट शिक्षण संस्थेचे सचिव उल्हास बोरगांवकर साहेब यांनी प्रतिमापूजन करुन या रोजगार मेळाव्याचे उद्घाटन करत रोजगार मेळाव्यासाठी शुभेच्छा दिल्या.                         

 उद्घाटन कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिल शित्रे यांनी महाविद्यालय अशा प्रकारे रोजगार मेळावा नियमित घेऊन विद्यार्थ्यांना रोजगाराच्या वेळोवेळी संधी उपलब्ध करून देत असल्याचे सांगितले.   यावेळी महाविद्यालयाचे करिअर गायडन्स आणि काउंसिलिंग सेलचे समन्वयक राजेश बोपलकर यांनी प्रास्ताविकात या रोजगार मेळाव्याचा उद्देश सांगितला. परम कौशल्य प्रशिक्षण प्रायव्हेट लिमिटेड चे एच आर रिक्रुटर अमोल उबाळे यांनी परम ही संस्था अनेक कंपन्यासाठी रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी सदैव कटिबद्ध असल्याचे सांगितले.  या रोजगार मेळाव्यात निवड झालेल्यांनी आपली करिअर उज्वल करावे असेही त्यांनी संदेश दिला.

यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. एन. बी. जाधव, प्रा. रमेश नन्नवरे, डॉ. मनोज झाडे, नॅक समन्वयक डॉ. प्रविण भाले,  डॉ. मंदार गायकवाड, डॉ. विनय चौधरी, प्रा. अनिल पाटील, प्रा. गोवर्धन पाटील, परम कौशल्य प्रशिक्षण इंडिया लि. चे अनिरुद्ध भोसले तसेच इतर प्राध्यापक उपस्थित होते. प्रो. अशोक मर्डे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर आभार डॉ. प्रविण भाले यांनी मानले .


 
Top