तुळजापूर / प्रतिनिधी-

  तिर्थक्षेञ तुळजापूरातील श्री तुळजाभवानी मंदीरमध्ये    पोर्णिमादिनी  सोमवार दि.६ रोजी  होमकुंडा समोर सांयकळी  होळी सण साजरा केला जाणार आहे.  होळी प्रज्वलित केल्यानंतर  जोगवा विधी होणार आहे.  होळी सण पार्श्वभूमीवर  पोर्णिमा छबिना काढण्यात येणार नसुन पोर्णिमा छबिना हिंदू नववर्षच्या प्रथम दिनी म्हणजे चैञी पाडव्याच्या राञी  काढण्यात यैणार आहे. 

 पौर्णिमानिमित्त खालीलप्रमाणे धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. यामध्ये पोर्णिमा पुर्व राञी  रविवार दि. ५ रोजी छबिना., सोमवार दि.६ रोजी मंदीरात होळी व  फक्त जोगवा,   मंगळवार दि.७रोजी छबिना., तरी भाविक भक्त पुजारी मंडळींनी यांची नोंद घेण्याचे आवाहन    तहसीलदार तथा व्यवस्थापक (प्रशासन)    श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान, तुळजापूर  यांनी केले आहे.

 
Top