उस्मानाबाद / प्रतिनिधी-

, जिल्हा पोलीस मुख्यालयात आयोजित पोलीस दरबारात  जिल्हा पोलीस अधीक्षक  अतुल कुलकर्णी यांनी मागील दहा वर्षात सेवानिवृत्त झालेल्या पोलीस अधिकारी व अमंलदारांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी सेवानिवृत्‌त पोलीस अमंलदार यांचे असोसीएशनचे जिल्हाध्यक्ष  खंडेराव गांधले यांनी, सेवानिवृत्त अधिकारी व अमंलदार यांची पेन्शन, थकीत वैद्यकीय बिले,पदोन्नती यांसह इतर समस्या पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्यासमोर मांडल्या.तसेच पोलीस परेड मैदनासमोरील मोकळ्या  जागेत पोलीसांच्या पाल्यांना उद्योग, व्यवसाय उभारण्यासाठी व्यावसायिक  गाळे बांधून देण्यात यावेत, अशी मागणी पोलीस बॉईज असोसीएशनचे संस्थापक अध्यक्ष वाघमारे यांनी केली.

     तसेच पोलीस अधीक्षक  अतुल कुलकर्णी  यांनी मागण्यांबाबत सकारात्मकता दर्शवून योग्य ती कार्यवाही करण्याची ग्वाही दिली. गेल्या दहा वर्षात प्रथमच अशा दरबारचे आयोजन करुन समस्या मार्गी लावण्यासाठी अनोखा उपक्रम घेतल्याबद्दल  सेवानिवृत्त पोलीस अधिकारी व अमंलदार यांनी समाधान व्यक्त केले.


 
Top