उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 वाहन चालकांमध्ये वाहतुक नियमांचे पालन करण्याबाबत जनजागृती करण्यासाठी ‘हासमुखराय’ हा बोलका बाहुला उस्मानाबाद जिल्हा पोलीसांच्या मदतीला आला आहे. मनोरंजक पध्दतीने वाहनचालकांना वाहतुकीचे नियम पाळून  वाहतुकीला शिस्त लावण्याचे आवाहन ‘हासमुखराय’ करत आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी वाहतुक शाखेमार्फत राबविण्यात येत असलेल्या या उपक्रमाच्या माध्यमातून वाहनचालकांनी वाहतुक वाहतुक नियमाचे पालन करुन शिस्तबध्दपणे वाहने चालवावीत, असे आवाहन केले.

  वाहतुक पोलीस हे केवळ  वाहनाच्या कागदपत्रांची  तापासणी, दंड आकरणे अशा  कामांसाठी नसून वाहतुकीला शिस्त लावणे, गर्दीमध्ये वाहतुक नियंत्रण करणे, अपघातासारख्या घटनाटाळणे यासाठी सदैव कार्यरत असतात. म्हणून वाहतुक पोलीसांना प्रत्येक वाहनचालकाने सहकार्य करणे गरजेचे आहे. त्याच बरोबर अतिवेगाने वाहन चालविणे, मद्यप्राशन करुन वाहन चालविणे  असे प्रकार वाहनचालकांनी टाळावेत. ऑनलाईन दंडाची रक्कम आपल्या मोबाईल फोनवर  मेसेजव्दारे आलेली असेल तर 11 फंबुरवारी 2023 रोजी होणाऱ्या लोकअदालतीला ती भरुन घ्यावी अणि पोलीस प्रशासन व न्यायव्यवस्थेला सहकार्य करावे, असे आवाहनही  त्यांनी  केले.

  यावेळी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्यासह  अपर पोलीस अधीक्षकएम.रमेश, उस्मानाबाद  शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. उस्मान शेख, आनंदनगर पोलास ठाण्याचे पोलीस निरीक्षक पारेकर, वाहतूकशाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मस्के व इतर अधिकारी अमंलदार उपस्थित होते.


 
Top