कळंब/ प्रतिनिधी-

येथील गुरव कुटुंबातील सदस्य असलेल्या  इमानदार कुत्रीचा अनोखा डोहाळे जेवणाचा कार्यक्रम पार पडला.      या कुटुंबात  डॉली  नावाची कुत्री असून, तिने सगळ्यांना लका लावला आहे.महिलांचे डोहाळे जेवण केले जाते, मग कुत्रीचे का नाही, हे लक्षात आल्याने, 

ही संकल्पना  मा. नगराध्यक्ष सौ. सविता पांडुरंग गुरव यांना सुचली,  आपण माणसांचं सर्व कार्यक्रम करतो तर ह्या मुक्या प्राण्याचे पण  डोहाळे जेवण करावे,

त्यासाठी पूर्ण घराची सजावट केली, मागे  बेबी शॉवर चे फुगे लावण्यात आले होते, समोर आरास मांडली होती, त्यात डॉलीचे आवडते खाद्य केक, बिस्कीट, ब्रेड, टोस्ट, जाम, व पाच प्रकारचे फळ ठेवण्यात आले होते,

डॉलीला ड्रेस व हिरवा कापडाने सजवले होते, तिची ओटी हि भरण्यात आली.गळ्यात-हातात हार घातले होते.महिलांचे जसे कार्यक्रम केले जातात, त्या प्रमाणे कार्यक्रम केला गेला.  कुटुंबातील इतर सदस्या प्रमाणे, तिचे येणाऱ्या दिवसात लाड पुरवले जाणार आहेत. या वेळी सर्वजण उपस्थित होते.आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

 
Top