परंडा /प्रतिनिधी - 

सिना कोळेगाव प्रकल्पातुन पाणी भोंजा ,सोनारी, कंडारी तलावात व कॅनल मध्ये सोडावे यासाठी आज भोंजा हवेली येथे शनिवार दि.२५ रोजी बैठक आयोजित करण्यात आली होती. 

     यावेळी शेतकरी लाभार्थी यांच्या अडी अडचणी सोडविण्यासाठी सिना कोळेगाव प्रकल्प चे संबंधित अधिकारी पदाधिकारी कायम शेतकऱ्यांच्या सोबत आहेत असे संपर्क केला असता सांगण्यात आले  असले तरी प्रत्यक्षात प्रकल्पातून पाणी सोडण्यासाठी रितसर निवेदनाद्वारे संबंधीत वरिष्ठअधिकारी यांना प्रकल्यातुन पाणी सोडण्यासाठी भेटून मागणी करण्याचे या बैठकीत ठरले.     

सिना कोळेगाव प्रकल्प अंतर्गत कंडारी शाखा कालवा पुर्ण झालेला असून लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांना रब्बी हंगामातील पपई, ऊस, हरभरा, राजमा, मका, भुईमूग, केळी, गव्हू इ. पिकांना तसेच मुक्या जनावरांना, प्राण्यांना, पक्षांना या कडाक्याच्या उन्हाळ्यात पाण्याचा फायदा होणार आहे तर सोनारी, कंडारी, भोंजा, कुभेंजा, खानापूर, रोसा, जामगांव या गावातील प्रकल्पाचे पाणी सोडल्यास हजारो शेतकऱ्यांचे समस्या दूर होणार आहेत.

    यावेळी बैठकीत सरपंच नवनाथ  मोरे,आण्णासाहेब जाधव, सदस्य अंकुश ईटकर, पंडीत भांदुर्गे, डायरेक्टर गणेशदादा नेटके, बागायतदार सागर भांदुर्गे, प्रविण पाटील, बापु लष्कर, शिवश्री नवनाथ नेटके, दत्ता नेटके, बाळासाहेब पडदुणे, बालाजी मोरे, राजाभाऊ मोरे, शिध्देश्वर भांदुर्गे, संचालक अमर नेटके, पै बाळासाहेब भांदुर्गे, दादा हावळे, गणेश मांजरे, खंडू मांजरे, संजय काशीद, प्रदिप मोरे, बळी निळ, निखिल मोरे, अमोल नेटके, अक्षय नेटके आदी शेतकरी मोठ्या संख्येने  उपस्थित होते.


 
Top