धाराशिव / प्रतिनिधी-

उस्मानाबाद शहराचे धाराशिव नामकरण झाल्याबद्दल शिवसेनेच्या वतीने शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे फटाक्यांची जोरदार आतषबाजी, गुलालाची उधळण करीत पेढे वाटून या निर्णयाचे जल्लोषात स्वागत करुन आनंदोत्सव साजरा करण्यात आला. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या ऐतिहासिक निर्णयाबद्दल शिवसैनिकांनी शिवसेना-भाजप सरकारचे आभारही व्यक्त केले.

 उस्मानाबाद शहराला पूर्वीचे धाराशिव हे नाव देण्यात यावे अशी मागणी गेल्या चाळीस वर्षापासून होत होती. परंतु आतापर्यंतच्या सरकारने याबाबत कोणतीही कार्यवाही केली नव्हती. त्यामुळे अनेक घटकांमधून या मागणीचा पाठपुरावा कायम सुरु होता. महाराष्ट्रात 6 महिन्यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या शिवसेना-भाजपा सरकारने उस्मानाबाद चे धाराशिव व औरंगाबादचे छत्रपती संभाजी नगर नामकरण करण्याबाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेऊन केंद्र शासनाकडे प्रस्ताव पाठविला होता. या प्रस्तावास केंद्र सरकारची मंजुरी मिळाली आहे. त्यानंतर महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रात याची अधिकृत अधिसूचना जारी करण्यात आली आहे. अनेक वर्षाची मागणी प्रत्यक्षात साकारली आहे. याबद्दल शिवसेनेेचे धाराशिव जिल्हाप्रमुख सुरज साळुंके यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे आनंदोत्सव साजरा करण्यात आला. शिवसैनिकांनी फटाक्यांची आतषबाजी व गुलालाची उधळण करत शहरवासीयांना पेढे भरवून मोठा जल्लोष केला.

 यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख सुरज साळुंके, शहरप्रमुख सनी पवार, संजय (आबा) मुंडे, बाळासाहेब शिंदे,भीमा (अण्णा) जाधव, सरपंच किरण लगदिवे, हरिभाऊ शिंदे, अमर माळी, ज्ञानेश्वर ठवरे, आबा देवकते, रोहन मोरे, रजनीकांत माळाळे, अजिंक्य आगलावे, शुभम पांढरे, गणेश जाधव, योगेश तुपे, दिनेश तुपे, संकेत हाजगुडे, सुरज राऊत, पिंटू पवार, दादा  घोरपडे, संतोष देवकते, लखन झीरमिरे, रामेश्वर घोगरे, नागेश थोरबोले, राहुल सुरवसे, प्रशांत पाटील, नागेश आगलावे, बापू कदम, रतन बनसोडे, अरविंद जवळेकर यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top