उस्मानाबाद /प्रतिनिधी

विद्यार्थ्यांनी कोणत्याही क्षेत्रामध्ये करिअर घडवत असताना प्रामाणिकपणा आणि सातत्य ठेवल्यास नक्कीच यश आपणाला गवसणी घालेल. उस्मानाबाद जिल्हा हा आत्महत्याग्रस्त आणि दुष्काळी भाग म्हणून ओळखला जातो ही ओळख पुसून काढून विकसित जिल्हा म्हणून त्याची नव्याने ओळख तयार करण्यासाठी विद्यार्थ्यांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा तयारीसाठी लागणारी सर्व प्रकारची मदत देण्याच्या तयारी आमदार कैलास पाटील यांनी दाखवली तर विद्यार्थ्यांसाठी आवश्यक असणाऱ्या पायाभूत सुविधा देखील रस्ता खेळाचे मैदान तयार करून देण्याचे आश्वासन आमदार कैलास पाटील यांनी दिले.

 येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात गुणवंतांच्या सत्कार समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून उस्मानाबाद तालुक्याचे मा.आमदार कैलास पाटील हे लाभले होते.  सदर कार्यक्रमात आमदार कैलास पाटील बोलत होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयीन विकास समितीचे सदस्य  विश्वास शिंदे हे  होते अध्यक्ष मनोगत व्यक्त करताना श्री शिंदे म्हणाले की विद्यार्थ्यांनी नेहमी वेळेचा सदुपयोग केला जावा त्यामुळे आपले ध्येय लवकर साध्य करता येते.

  याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जयसिंग  देशमुख कार्यक्रमाचे प्रस्तावित करताना म्हणाले की, रामकृष्ण परमहंस महाविद्यालय हे या पंचक्रोशीतील नावाजलेले श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे महाविद्यालय आहे. प्रत्येक वर्षी या महाविद्यालयातील विद्यार्थी विद्यापीठाच्या परीक्षेमध्ये सुवर्णपदक मिळवतात. अशा प्रकारची गुणवत्ता अबाधित ठेवण्याची या महाविद्यालयाची मोठी परंपरा आहे. आपण विद्यार्थ्यांना देऊ केलेल्या मदतीमुळे आमच्या महाविद्यालयातील विद्यार्थी नक्कीच त्याचा सदुपयोग करून यशस्वी होतील आणि उस्मानाबाद जिल्ह्याचे नाव भारतातील एक विकसित आणि अधिकाऱ्यांचा जिल्हा म्हणून नव्याने भारताच्या नकाशावर कोरतील.  याप्रसंगी उस्मानाबाद शहरातील सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब गोरे यांना त्यांच्या सामाजिक कार्याबद्दल महाविद्यालयातर्फे मानपत्र देऊन त्यांचा सन्मान आमदार कैलास पाटील ,विश्वास  शिंदे आणि प्राचार्य डॉ.जयसिंग  देशमुख यांच्या शुभहस्ते करण्यात आला.  सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.वैभव आगळे यांनी केले तर आभार डॉ.शिवाजी  गायकवाड यांनी मानले.    सदर कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील विद्यार्थी आणि गुरुदेव कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 

 
Top