उस्मानाबाद /प्रतिनिधी

घुगी, ता.धाराशिव येथील हनुमान मंदिर व विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समोरील सभामंडपाचे जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्षा  अर्चना  पाटील यांच्या शुभहस्ते भूमिपूजन संपन्न झाले. सदरील कामासाठी आमदार  राणाजगजितसिंह पाटील  यांनी आपल्या आमदार निधीतून १७ लक्ष रुपये निधी उपलब्ध करून दिला आहे.

  आता राज्यात आपले सरकार असल्यामुळे यापुढे देखील विविध शासकीय योजनांमधून विकास कामांसाठी निधी कमी पडू दिले जाणार नाही. समाजातील प्रत्येक घटकाच्या भावनेचा विचार करून विकास साधने आमचे उद्दिष्ट आहेत. असे सौ.अर्चनाताई पाटील म्हणाल्या.

 याप्रसंगी  सुधाकर गुंड गुरूजी,  बाबुराव पुजारी,  नागनाथ अप्पा पवार, ज्ञानेश्वर जंगाले,  नीलकंठ पाटील,  अर्जुन जावळे,  शेषेराव जावळे,  बंडू जावळे, बापू जावळे,  बाळू जावळे, शाहूराज जावळे, बालाजी जावळे, श्रीकांत जावळे, प्रदीप जावळे,  तानाजी जावळे,  अशोक इंगळे,  गणेश पवार, प्रमुख कार्यकर्ते, ग्रामस्थ व महिला-भगिनींची उपस्थिती होती.

 
Top