उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 जिल्हयातील गरजू माजी सैनिक,विधवा इतर नागरीक यांना कळविणेत येते की, जिल्हा सैनिक  कल्याण कार्यालय, उस्मानाबाद यांच्या अधिपत्याखालील माजी सैनिकांचे विश्रामगृह, उस्मानाबाद येथे अशासकीय चौकीदार कर्मचारी पद निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात कंत्राटी पध्दतीने भरावयाचे आहेत. इच्छुक व गरजू माजी सैनिक,माजी सैनिक विधवा व इतर नागरीकांनी दिनांक 27 फेब्रुवारी 2023 पर्यंत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालयाचे आवार, उस्मानाबाद-413 501 येथे अर्ज सादर करावेत व 28  फेब्रुवारी 2023 (मंगळवार) रोजी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालयाचे आवार उस्मानाबाद येथे  मुलाखती करिता उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, उस्मानाबाद, मेजर मिलिंद तुंगार (नि.)  यांनी केले आहे.


 
Top