उस्मानाबाद / प्रतिनिधी-

उस्मानाबाद तालुक्यातील जहागीरदारवाडी येथे बंजारा समाजाचे आराध्यदैवत सद्गुरू संत सेवालाल महाराज यांची 284 वी जयंती बुधवारी (दि.15) उत्साहात साजरी करण्यात आली. जयंतीनिमित्ताने विविध सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

 जयंती उत्सवात सद्गुरू संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन सरपंच शशिकांत राठोड व उपसरपंच अविनाश चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. जयंतीनिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात तरुणांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. दिवसभरात 120 दात्यांनी रक्तदान केले. कार्यक्रमाला जहागीरदारवाडी ग्रामपांयतचे ग्रामसेवक एकनाथ माने,अ‍ॅड. राज शशिकांत राठोड, गेनदेव राठोड, अशोक जाधव, उत्तम चव्हाण, शेषेराव चव्हाण,अर्जुन रणखांब, विलास सुरवसे, दादा मिसाळ, सुशीलाबाई चव्हाण, तंटा मुक्ती अध्यक्ष संजय चव्हाण,नानासाहेब पवार, पोलीस पाटील रंजना राठोड, रतन चव्हाण, सुनील चव्हाण, तुकाराम चव्हाण, सागर राठोड, विश्वजित राठोड, दिलीप राठोड, शंकर राठोड विजय राठोड, रवी राठोड, विठ्ठल राठोड, योगेश राठोड, पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह बंजारा तरुण मंडळाचे सदस्य व इतर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 
Top