उस्मानाबाद / प्रतिनिधी-

पोलिसांनी मिळालेल्या गोपनिय माहितीच्या आधारे अनैतिक देह व्यापार चालणार्‍या दोन लॉजवर 13 व 14 फेब्रुवारी रोजी छापे मारले. यामध्ये कळंब येथे 6 जणांविरूद्ध तर उस्मानाबाद ग्रामीण पोलीस ठाण्यात चौघांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील पीडित महिलांची पोलिसांनी सुटका केली आहे.

पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी यांच्या आदेशावरुन एम. रमेश, सहाय्यक पोलीस अधिक्षक उपविभाग कळंब यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरिक्षक रविंद्र गायकवाड पोलीस ठाणे कळंब, पोलीस उपनिरिक्षक वर्षा साबळे, पोहेकॉ गलांडे, चव्हाण, अंभोरे, मोहिते, राऊत, खांडेकर, गरड, सोनटक्के, मपोअं गिते, पत्तेवार यांना कळंब शहरातील शिवप्रसाद लॉजमध्ये विनापरवाना बेकायदेशीररित्या कुंटलखाना चालू असल्याची माहिती मिळाली. सदर पथकाने दोन डमी ग्राहकांना सदर ठिकाणी पाठवून खात्री केली असता सदर ठिकाणी कुंटलखाना चालू असल्याचे दिसून आले. या ठिकाणी 13 फेब्रुवारी रोजी छापा मारला असता सदर ठिकाणी कुंटलखाना चालविणारा गोविंद श्रीमंतअप्पा लोखंडे, बाबु श्रीमंतअप्पा लोखंडे, ग्राहक इसम बिलाल शेख, नुर बागवान (वय 30, रा. मोमीन गल्ली कळंब) व ज्ञानेश्वर भाऊराव होनमाने (रा. नागरझरवाडी), संतोष प्रकाश लिके (वय 35 रा. खर्डा), विजय सुभाष इंगळे (वय 32, रा. वाकुद, ता. जामनेर) असे 6 जण पीडित मिळून आले. सदर ठिकाणाहुन दोन पीडित महिलेची सुटका करण्यात आली. सदर व्यक्तींविरूध्द पोलीस ठाणे कळंब भादंसं कलम- 370, 370 अ (2), 34 सह मानवी अनैतिक व्यवसाय प्रतिबंधक अधिनियम कलम- 3, 4, 5 अंतर्गत पोलीस ठाण्यात आज दि. 14.02.2023 रोजी गुन्हा नोंदवला आहे.

याशिवाय, 14 फेब्रुवारी रोजी मिळालेल्या माहितीनुसार उस्मानाबाद ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये मयुरेश हॉटेल लॉज अ‍ॅन्ड बारच्याजवळ छापा मारला. याठिकाणी पीडित महिला मिळून आली. तिच्या सांगण्यावरून रंजित रघुनाथ भोसले, गौरी लोकनाट्या कला केंद्र वडगाव येथील पार्टी मालकीन हिने येडशी उड्डानपुलाजवळ उस्मानाबाद ते बीड जाणारे रोडलगत  मयुरेश हॉटेल लॉज अ‍ॅन्ड बार मालक नानासाहेब तानाजी पवार (वय 40, रा. येडशी), लॉज चालक रंजित रघुनाथ भोसले (वय 36, रा. येडशी), प्रदिप त्रिंबक मुंढे (वय 33, रा. वडगाव जहांगिर ता. कळंब), मनोज काकडे (सेलु ता. परभणी) हे सर्वजण संगणमत करून स्वत:च्या आर्थिक फायद्याकरीता ग्राहकास त्यांच्या मागणी प्रमाणे समागमणासाठी वेश्या व्यवसायासाठी आपल्या लॉजमध्ये रूम उपलब्ध करुन देणे त्यांना लैंगिक स्वैराचाराकरीता परावृत्त करून त्यांच्यावरती उपजिवीका करीत असल्याचे समजले. महिलांची सुटका करुन लॉज चालक मालक नमूद व्यक्तीविरूध्द भादंसं कलम 370, 370 अ (2), 34 सह मानवी अनैतिक व्यवसाय प्रतिबंधक अधिनियम कलम- 3, 4 , 5 अंतर्गत उस्मानाबाद ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे.

सदरची  कामगिरी पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी यांच्या आदेशावरून कळंब पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक रविंद्र गायकवाड पोलीस ठाणे कळंब, पोलीस उपनिरिक्षक वर्षा साबळे, पोहेकॉ गलांडे, चव्हाण, अंभोरे, मोहिते, राऊत, खांडेकर, गरड, सोनटक्के, मपोअं गिते, पत्तेवार यांच्या पथकाने केली.


 
Top