उस्मानाबाद/ प्रतिनिधी

 येथील रामकृष्ण परहंस महाविद्यालयात प्राचार्य डॉ.जयसिंगराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा महाविद्यालयीन स्तरावरील पदवी वितरण समारंभ उत्साहात संपन्न झाला.  या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षणतज्ञ श्री एम डी देशमुख तर कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयीन विकास समितीचे सदस्य श्री नानासाहेब पाटील हे लाभले होते.

   कार्यक्रमाचे प्रस्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख यांनी केले,सूत्रसंचालन डॉ.केशव क्षीरसागर यांनी केले तर आभार परीक्षा विभाग प्रमुख प्रा. श्रीराम नागरगोजे यांनी केले.     सदर कार्यक्रमास सर्व गुरुदेव कार्यकर्ते आणि 2020-21 मधील पदवी प्राप्त विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top