उमरगा / प्रतिनिधी-

उमरगा व लोहारा तालुक्यातील ३ पुलांच्या कामांसाठी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या प्रयत्नांतून नाबार्ड योजनेअंतर्गत ६ कोटी २० लक्ष रु. निधी मंजुर झाल्याची माहिती आमदार ज्ञानराज चौगुले यांनी दिली आहे. 

आमदार ज्ञानराज चौगुले यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे लोहारा तालुक्यातील आरणी-कास्ती बु. लोहारा ते हिप्परगा रवा रस्ता प्रजिमा ४१ रस्त्यावर आरणी गावाजवळ लहान पुलाचे बांधकाम करणेसाठी २०० लक्ष रुपये, लोहारा-मोघा - वडगाव - फनेपूर - रुद्रवाडी - मोघा रस्ता  इजिमा ९८  रस्त्यावर मोघा गावाजवळ लहान पुलाचे बांधकाम करणेसाठी २७० लक्ष रुपये तसेच कुन्हाळी - मुळज - राष्ट्रीय महामार्ग रस्ता रा.मा. २४० रस्त्यावर कुन्हाळी गावाजवळ लहान पुलाचे बांधकाम करणेसाठी १५० लक्ष रुपये मंजूर झाल्याची माहिती आमदार ज्ञानराज चौगुले यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.


 
Top