उमरगा / प्रतिनिधी-

डॉ. कुशाबा धोंडीबा शेंडगे सीबीएसई स्कूल, उमरगा येथे सहाव्या वार्षिक स्नेहसमेलन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी चिमुकल्यांनी भारतीय संस्कृतीचे सादरीकरण करत मणीपुरी नृत्य, पंजाबी भांगडा नृत्य, अभंग, गवळणी, राष्ट्रगित, रामायण, शिवचरित्र, कोरोना इ. नृत्य व नाटके सादर करण्यात आली. कार्यक्रमासाठी विध्यार्थी व पालक मोठया संख्येने उपस्थित राहून विध्यार्थ्यांच्या कलागुणांना दाद दिली.

 कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ शेंडगे चॅरि्टेबल ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. सचिन शेंडगे तर प्रमुख पाहुणे म्हणून उमरगा उपविभागीय पोलिस अधिकारी रमेश बरकते, मुख्याधिकारी रामकृष्ण जाधवर, श्रीमती मीनाताई शेंडगे, डॉ. सुहासिनी शेंडगे, डॉ. नीलरोहित पैके, डॉ. तोष्णीवाल, सचिव डॉ सारिका बेडदुर्गे, डॉ विजय बेडदुर्गे, प्रा गोरख घोडके, प्रा अशोक दुधभाते, मुख्याध्यापिका आशा चोकडा, मुख्याध्यापक कुलकर्णी डी. बी., उपमुख्याध्यापक डॉ. प्रमोदकुमार भुक्तर आदी उपस्थित होते.

माता सरस्वती व तसेच कै. डॉ. के. डी. शेंडगे यांच्या प्रतिमा पूजनाने व दिपप्रज्वलनाने कार्यक्रमाला सुरुवात झाली. तदनंतर उपस्थित मान्यवरांचे यथोचित स्वागत करण्यात आले.यानंतर क्रीडा, वादविवाद, वक्तृत्व इ स्पर्धा व इयत्ता १०वीतील  गुणवंत विध्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देऊन गौरविण्यात आले. इयत्ता १०वीतील जान्हवी हिरवे या विध्यार्थिनीला 'आदर्श विध्यार्थी' पुरस्काराने सन्मानित करुन हर्षा पाटील यांचे पालक श्री व सौ पाटील यांना उत्कृष्ट पालक पुरस्कार प्रदान करण्यात आला. क्रीडा शिक्षक विशाल बेलुरे यांना उत्कृष्ट पुरस्काने सन्मानित करण्यात आले. त्याचबरोबर तालुकास्तरीय सामान्य ज्ञान स्पर्धेतील गुणवंत विद्यार्थ्यांचे रोख रक्कम व प्रमाणपत्र देऊन कौतुक व अभिनंदन करण्यात आले. उमरगा विभागातून उळेकर सिद्धांत अंबादास व पांचाळ गौरव गोविंद श्री. महात्मा बसवेश्वर विद्यालय, उमरगा यांनी प्रथम क्रमांकाचे बक्षीस मिळवले तसेच औरादे समृद्धी सतिश, भारत विद्यालय, उमरगा व जाधव नंदकिशोर नवीन आदर्श विद्यालय, उमरगा या विध्यार्थ्यांना द्वितीय क्रमांक मिळवला तर मुजावर सिमरन इलाही, लवटे यश हरी व कानेकर पल्लवी पांडुरंग श्री ज्ञानेश्वर विद्यालय, तुरोरी येथील  विध्यार्थ्यांनी उत्तेजनार्थ पारितोषिके मिळवली. तर भोसगा विभागातून घेतलेल्या सामान्य ज्ञान स्पर्धेत मंडले प्रशांत विजय, धर्मवीर संभाजी विद्यालय, भोसगा प्रथम क्रमांक,भोजने वैष्णवी बालाजी एस. पी. हायस्कूल, वडगाव द्वितीय व माने दिलीप जनार्दन तृतीय  क्रमांक मिळवला असून फुलचंद साधना राजेंद्र एस. पी. हायस्कूल वडगाव, कदम प्रतीक्षा मल्लिनाथ विद्या विकास हायस्कूल, अचलेर व बनसोडे संस्कार जितेंद्र, ज्ञान प्रबोधिनी विदयालय,हराळी या विध्यार्थ्यांनी उत्तेजनार्थ पारितोषिके मिळवली.

या कार्यक्रमात भारतीय संस्कृतीचे सादरीकरण करण्यात आले. मणीपुरी नृत्य, पंजाबी भांगडा नृत्य, रामायण, शिवचरित्र, कोरोना इ. नृत्य व नाटके सादर करण्यात आली. कार्यक्रमासाठी विध्यार्थी व पालक मोठया संख्येने उपस्थित राहून विध्यार्थ्यांच्या कलागुणांना दाद दिली. कार्यक्रम विभाग प्रमुख पूनम सूर्यवंशी यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे कार्यक्रमासाठी योगदान लाभले.

 
Top