उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 जिल्हा पोलीस अधीक्षक  अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली उस्मानाबाद जिल्ह्यातील पोलीस अधिकारी,अंमलदारासाठी मुंबई येथील प्रसिध्द सायबर तज्ञ गोविंद रे यांचे तीन दिवसीय सायबर विषयक मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन आज रोजी करण्यात आले होते.

 गोविंद रे  यांनी तीन दिवसीय सायबर गुन्ह्याची ओळख, त्याचा तपास कसा करावा, तांत्रीक पुरावे कसे गोळा करावे, पोलीसा पुढील भविष्यात सायबर गुन्हेगारीचे आवाहन या विषयावर मार्गदर्शन केले. कार्यशाळेत पोलीस अधिकारी अंमलदार यांनी विचारलेल्या  शंकेचे गोविंद रे  यांनी  निरासन करुन आवश्यक ते मार्गदर्शन केले. सायबर गुन्ह्याची उकल होवून गतिमान तपास होईल या उद्देशाने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यात जिल्हयातील सर्व पोलीस अधिकारी अंमलदार मोठया संख्येने उपस्थित होते.

 
Top