उमरगा / प्रतिनिधी-

अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढीसह इतर मागण्यासाठी अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या वतीने संप पुकारण्यात आला आहे. त्यानुषंगाने महाराष्ट्र राज्य अंगणवाडी सेविका व मदतनीस महासंघ कर्मचाऱ्यांनी आमदार ज्ञानराज चौगुले यांची भेट घेऊन त्यांच्या मागण्यांसंदर्भात निवेदन दिले. यावेळी आमदार ज्ञानराज चौगुले यांनी पुढील महिन्यात होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात यासंदर्भात आवाज उठवणार असल्याचे आश्वासन दिले व शासन स्तरावर या संदर्भात योग्य तो पाठपुरावा करणार असल्याची ग्वाही दिली.

युती शासनाच्या काळात आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या पाठपराव्यानुसार व त्यांनी विधिमंडळात केलेल्या आंदोलनामुळे मानधन वाढ करण्यात आली होती. तेंव्हापासून आजतागायत अंगणवाडी कर्मचारी यांच्या मानधनात वाढ झालेली नाही व इतर अनेक समस्यांच्या निराकरणाच्या दृष्टीने सध्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या वतीने संप पुकारण्यात आला आहे. त्यानुषंगाने महाराष्ट्र राज्य अंगणवाडी सेविका व मदतनीस महासंघ कर्मचाऱ्यांनी शनिवारी (दि.२५) त्यांच्या विविध मागण्यांसंदर्भात आमदार ज्ञानराज चौगुले यांची भेट घेऊन त्यांच्या मागण्यांसंदर्भात निवेदन देण्यात आले. यावेळी आमदार ज्ञानराज चौगुले यांनी सविस्तर चर्चा करुन सध्या पुढील महिन्यात होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात यासंदर्भात आवाज उठवणार असल्याचे आश्वासन दिले व शासन स्तरावर या संदर्भात योग्य तो पाठपुरावा करणार असल्याची ग्वाही दिली.

 निवेदनावर तालुक्याध्यक्ष सुरेखा ठाकुर, तुगाव बीट प्रमुख बेबीसरोजा चंद्रकांत सुरवसे, येणेगुर बीट फरजाना मुक्तार शेख, बीट प्रमुख मनीषा सांगवे, फरजाना अजगरअली शेख, बेबीनंदा शंकरराव सावंत, आशा केशवराव टिके, वर्षा बजरंग सोनकांबळे, संगीता महादेव सोनकांबळे आदी कर्मचाऱ्यांच्या निवेदनावर सह्या आहेत.


 
Top