तुळजापूर / प्रतिनिधी-

 जिल्हा  भारत स्काऊट आणि गाईड्स विभाग वतीने , उस्मानाबाद येथे  आयोजित केलेल्या कब- बुलबुल, स्काऊट-गाईड जिल्हा मेळावात   जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मसला खुर्द सहा पदके  पटकवले.

यात शाळेतील  स्काऊटचे 11 व कब चे 11 असे एकूण 22 विद्यार्थी सहभागी झाले होते. या  मेळाव्यात विविध स्पर्धा घेण्यात आल्या.त्यापैकी बिन भांड्याचा स्वयंपाक, लोकनृत्य व तंबू सजावट या स्पर्धांमध्ये प्रथम क्रमांक तर समूहगीत,शोभायात्रा व हस्त कौशल्य या स्पर्धेत द्वितीय क्रमांक अशी एकूण सहा पदके पटकावली आहेत. स्काऊटच्या विद्यार्थ्यांना स्काऊट मास्तर नागनाथ बोडके यांनी तर कब च्या विद्यार्थ्यांना कब मास्टर बालासाहेब चिवडे  यांनी मार्गदर्शन केले.

या यशाबद्दल सहभागी विद्यार्थी व दोन्ही मार्गदर्शक शिक्षकांचे गावचे सरपंच,उपसरपंच,सदस्य, शाळा व्यवस्थापन समिती चे अध्यक्ष, उपाध्यक्ष व सर्व सदस्य,शाळेचे मुख्याध्यापक मारूती घंदूरे  व सर्व शिक्षकांनी  आणि ग्रामस्थांनी अभिनंदन केले.


 
Top