तुळजापूर / प्रतिनिधी-

 काटगाव येथील डॉ. एपीजी अब्दुल कलाम विद्यामंदीरच्या अनीवल फंक्शन सोहळ्यात चिमुकल्यांनी अप्रतिम  नृत्य अविष्कार सादर करुन उपस्थितींचे मने जिकंली.

काटगाव येथे या कार्यक्रमाचे उद्घाटन माजी सभापती वसंतराव वडगावे यांच्या  हस्ते व  सरपंच अशोक माळी,  संस्थेचे अध्यक्ष शिवाजी शिंदे, बालाजी शिंदे, बालाजी  बेटकर, चनवीर बेटकर, निवृत्ती माळी, नागेश चौघुलेसह अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. श्रीगणेशाचे वंदन करून सांस्कृतिक कार्यक्रमाचा आरंभ झाला. त्यानंतर देशभक्तीपर तसेच महिषाससुर मर्दीनी  गीतांनवर चिमुकल्यांनी केलेल्या नृत्य अविष्काराने रसिक मंञमुग्ध झाले. या कार्यक्रमास पालकांनसह काटगाव पंचकोर्षीतील ग्रामस्थ मोठ्या संखेने उपस्थितीत होते. 


 
Top