उस्मानाबाद / प्रतिनिधी-

आरोग्य विभागा मार्फत जिल्हयातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र आणि आरोग्य वर्धिनी उपकेंद्रात भव्य सायक्लाथॉनचे आयोजन करण्यात आले. या सायक्लाथॉनचे यावर्षीचे घोषवाक्य हे " आरोग्यासाठी सायकल, सर्वांगीण निरोगी आरोग्याचे ध्येय निश्चीत गाठू" असे देण्यात आले आहे. या सायक्लाथॉनचे संपूर्ण देशभरातील शासकीय आरोग्य संस्थां स्तरातून आयोजित करण्याबाबत केंद्रशासनाच्या सूचना प्राप्त आहेत. या सूचना अन्वये जिल्हयातील सर्व 44 प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि 215 आरोग्य वर्धिनी उपकेंद्रात भव्य अशा सायक्लाथॉनचे आयोजन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितीन बोडके यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजन करण्यात आले आहे.

 या भव्य सायक्लाथॉनचा जिल्हास्तरीय शुभारंभ तुळजापूर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र सावरगाव अंतर्गत आरोग्य वर्धिनी उपकेंद्र माळंब्रा येथे करण्यात आला. यामध्ये 5 वी ते 10 पर्यतच्या सर्व विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.

 जिल्हास्तरीय शुभारंभ प्रसंगी अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.शिवकुमार हालकुडे, सी. पी. एच. सी. समुपदेशक डॉ. पी. डी. धनके, वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र सावरगाव डॉ. क्षीरसागर, समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. स्वाती बारसकर, आरोग्य सेवक व आरोग्य सेविका, शिक्षक, शिक्षीका तसेच आरोग्य कर्मचरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.असे जिल्हा आरोग्य अधिकारी,डॉ.एन.डी.बोडके  यानी कळविले आहे.


 
Top