उस्मानाबाद / प्रतिनिधी-

वॉटर शेड ऑरगोनाईझेशन ट्रस्ट यांचे वतीने आयोजित बामणी येथे आयोजित महीला मेळाव्यास महीला सुरक्षा संदर्भाने माहीती  जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक देवकन्या मैंदाड व सोबत पिंकपथक टिम उप विभाग, उस्मानाबाद यांनी ग्रामीण भागातील महीलांना स्वता:चे संरक्षण कसे करावे भरोसा सेल, डायल 112, बालगुन्हेगारी, महीला सुरक्षा संदर्भाने घ्यावयाची दक्षाता तसेच महीला विषयी कायदे बालविवाह, बाललैंगिक अत्याचार याबाबत मार्गदर्शन करण्यात आले आहे.

 सदर वॉटर शेड ऑरगोनाईझेशन ट्रस्ट यांचे वतीने आयोजित बामणी येथे आयोजित महीला मेळाव्यास पोलीस उपनिरीक्षक देवकन्या मैंदाड, ट्रस्टचे अध्यक्ष श्री अभिजीत कवठेकर तसेच मोठया प्रमाणत महीला उपस्थितीत होत्या.


 
Top