उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 शहरातील मध्यवर्ती शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने बुधवारी (दि.15) छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे आकर्षक एलईडीसह लेजर लाईटिंग शो तसेच भव्य अशा भगव्या झेंड्याचे ध्वजारोहण खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या हस्ते करण्यात आले.

 सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास झालेल्या या कार्यक्रमास माजी नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर, भैरवनाथ शुगरचे संचालक केशव सावंत, समितीचे अध्यक्ष धनंजय राऊत, शशिकांत निंबाळकर, यशदा मल्टीस्टेटचे चेअरमन सुधीर सस्ते, यशवंत पतसंस्थेचे सतीश दंडनाईक, अ‍ॅड. राम गरड, दर्शन कोळगे, नितीन तावडे, प्रविण कोकाटे, नितीन शेरखाने, पत्रकार संतोष जाधव, महेश पोतदार, गणेश खोचरे, रवि वाघमारे, धर्मराज सुर्यवंशी, चंद्रकात देशमुख, राजसिंह राजेनिंबाळकर, अजित लाकाळ, बलराज रणदिवे, मयुर काकडे आदींसह शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top