उस्मानाबाद / प्रतिनिधी-

अज्ञात कारणावरून तरूणाने एकाचा खून केला. सदर घटना उस्मानाबाद शहरातील एका पडक्या बोर्डींगमध्ये घडली.

उस्मानाबाद शहरातील तांबारी विभाग येथील करण कृष्णा पवार (वय 22) याने 14 फेंब्रुवारी रोजी शहरातील श्रीपतराव भोसले हायस्कुलच्या जुन्या बोर्डींगमधील पडक्या रूममध्ये अज्ञात कारणासाठी  भूम शहरातील शेंडगे गल्ली येथील रामेश्वर विश्वनाथ शेवकर (वय 76) यांच्या डाव्या डोळ्याच्या वरील भागास वार करून जखमा करत खून केला.

याप्रकरणी प्रमोद नरसिंग कदम (रा. तांबारी विभाग उस्मानाबाद) यांनी 14 फेब्रुवारी रोजी आनंदनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून भादंसं कलम 302 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


 
Top