उस्मानाबाद / प्रतिनिधी-

उस्मानाबाद येथील हजर खॉजा शम्शोधीन गाझी यांचा उरुसासाठी जिल्हा व पोलीस प्रशासनामार्फत आवश्यक ती खबरदारी घेण्यात येत आहे. कोरोना काळानंतर यावर्षी ऊरुसामध्ये गर्दी वाडण्याची शक्यता लक्षात घेवुन नियोजन करण्यात आले आहे. उरुसाच्या कालावधीत अनुचित प्रकार घडु नये याकरीता पोलीस प्रशासन दक्ष आहे. सर्वांनी उरुस  शांततेत पार पाडण्यासाठी सहकार्य करावे. असे आवाहान जिल्हा पोलीस अधीक्षक  अतुल कुलकर्णी यांनी शांतता कमेटीच्या बैठकीत केले आहे. 

हजर खॉजा शम्शोधीन गाझी यांच्या उरुसाच्या पार्श्वभुमीवर उस्मानाबाद शहर पोलीस ठाण्यात शांतता कमेटी, उरुस कमेटी, मोहल्ला कमेटीची बैठक जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक  एम रमेश शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी  उस्मान शेख, आनंद नगर पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी श्री पारेकर यांचे प्रमुख उपस्थितीत शनिवारी दि. 4 फेब्रुवारी 2023 रोजी घेण्यात आले. 

बैठकीत बोलताना जिल्हा पोलीस अधीक्षक  अतुल कुलकर्णी म्हणाले की, सार्वजनिक उत्सव शांततेत पार पाडण्याची जबाबदारी पोलीसांएवढीच संयोजन समीती आणी प्रतेक नागरीकांची आहे. त्यासाठी सर्वांनी दक्षता घेणे जरुरी आहे. उरुसाच्या पार्शव भुमीवर सीसीटीव्ही कॅमेरे, संबंधीत विभागाकडुन रस्त्याचे पॅचवर्क, विद्युतीकरण अशी कामे करण्यात आलेली आहेत. उरुसानिमित्त संदल आणी चादर मिरवणुकीमध्ये आवाजाची मर्यादा राखावी. मोठया स्पीकर्स ऐवजी पारंपारीक वाद्याचा वापर करावा,असे आवाहान त्यांनी केले. 

यावेळी अपर पोलीस अधीक्षक एम रमेश, पोलीस निरीक्षक उस्मान शेख यांनीही मार्गदर्शन केले. शांततता कमेटीच्या वतीने मसुद शेख मैनुदिन पठाण यांनी आवश्यक त्या सुचना पोलीस प्रशासनाकडे मांडल्या बैठकीत उरुस कमेटी, शांतता कमेटी, मोहल्ला कमेटीचे पदाधीकारी तसेच प्रतिष्ठीत नागरिक उपस्थिती होते.


 
Top