परंडा  / प्रतिनिधी-

 परंडा तालुक्यातील देवगाव [ बु ] येथे उमेद अभियान अंतर्गत  नवनिर्माण महिला प्रभाग संघ ,शेळगाव यांची वार्षिक सर्वसाधारण सभा दि.२५ रोजी घेण्यात आली.

या सभेमध्ये सर्वप्रथम सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन सरपंच पुजा ठाकरे , माजी सभापती अनुजा दैन , उपसरपंच दुर्गा कदम यांच्या हस्ते करण्यात आले.या कार्यक्रमास प्रमुख पाहूणे म्हणून महाराष्ट्र ग्रामिण बँकेचे शाखा व्यवस्थापक कदम , जि . प. शाळेचे मुख्याध्यापक देवकर यांची उपस्थिती होती. शेळगांव  प्रभागाचे प्रभाग समन्वयक धनंजय चांदणे यांनी  २०२१ते २०२२आर्थिक वर्षाचे प्रभाग संघ लेखापरीक्षण वाचन केले . तसेच सर्व समूहाचे व ग्रामसंघाचे मार्च २०२२ पर्यंत ची लेखापरीक्षण अहवाल , मूल्यांकन अहवाल , प्रभागसंघा मार्फत प्रभागात राबविण्यात आलेल्या शासकीय योजना उपक्रम सामाजिक कार्य अहवाल, प्रभाग संघास प्राप्त एप्रिल २०२१- २०२२ निधी व वितरीत निधी अहवाल, तसेच प्रभागातील आर्थिक समावेशन अहवाल वाचन करण्यात आले.

 या वार्षिक सर्व साधारण सभेत उमेद चे तालुका अभियान व्यवस्थापक तुकाराम ढोरे , तालुका आर्थिक समावेशन चे तालुका व्यवस्थापक माणिक सोनटक्के यांनी प्रभागातील महिलांना मार्गदर्शन करून उमेदचे महत्त्व सांगितले . प्रभाग व्यवस्थापक पुष्पा सावंत , प्रेरिका  - जयश्री शेवाळे ,  राणी कोल्हे , विदया औताडे यांच्या सह प्रेरिकांनी उमेद अभियानात आल्या पासून जीवनात झालेला बददल व उमेद चे महत्व किती आहे या विषयी मनोगते व्यक्त केली . कार्यक्रमास प्रभाग समन्वयक समाधान माळी , विजय गवळी , प्रभाग संघ अध्यक्ष - सचिव - कोषाध्यक्ष यांच्या सह प्रभागातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या . कार्यक्रमाचे उत्तम नियोजन प्रभाग समन्वयक धनंजय चांदणे व प्रेरिकांनी केले होते . कार्यक्रमाचे सुत्र संचालन व आभार राणी कोल्हे व समाधान माळी यांनी केले.


 
Top