नळदुर्ग/प्रतिनिधी-

 येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत शुक्रवार ता.२४ रोजी बाल आनंद मेळावा संपन्न झाला.  सकाळी १० वाजता मुख्याध्यापक भास्कर मस्के यांच्या मार्गदर्शना खाली  विद्यार्थ्यांनी विविध खाद्य पदार्थांचे छोटे स्टॉल लावून मेळाव्याची सुरवात केली. 

विद्यार्थ्यांनी पालकांच्या मदतीने बनविलेले विविध खाद्य पदार्थांची विक्री केली, यातून नफा कामविण्यासोबत विद्यार्थ्यांना व्यावहारिक ज्ञान मिळावे, नोकरीच्या मागे न लागता व्यवसाय, व्यापार करून आपली उपजीविका करता यावी, दैनंदिन जीवनात वावरताना विद्यार्थ्यांमध्ये व्यवहारिक वृत्ती वृद्धीगंत व्हावी या उद्देशाने बाल आनंद मेळावा घेण्यात आला. यावेळी पालकांनीही भेट देत पदार्थ खरेदी करत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन  दिले. शालेय शिक्षण समितीचे राम सातपुते, नेताजी महाबोले, अलंका कोरे यांनी मेळाव्यास हजेरी लावली. मेळावा यशस्वी करण्यासाठी शाळेचे  मुख्याध्यापक भास्कर मस्के , सहशिक्षक बिलाल सौदागर, महोयोद्दीन सय्यद,  सहशिक्षिका सुंदर भालकटे, वंदना चौधरी, सुरेखा मोरे , शिपाई सुनिता यादगीरे यांनी परिश्रम घेतले.


 
Top