तुळजापूर  / प्रतिनिधी-

मौजे मंगरूळ (ता .तुळजापूर )  येथील  ३३/११ केव्ही मंगरूळ सब स्टेशन मध्ये आणखी एक ५ एमव्हीए चा ट्रान्सफार्मर बसवण्याची मागणी मंगरुळ येथील शेतकऱ्यांनी मा. अधीक्षक अभियंता  महावितरण कार्यालय उस्मानाबाद, यांना निवेदन देऊन केली आहे 

निवेदनात म्हटल आहे की, मंगरूळ परिसरातील शेतकऱ्यांना वीजपुरवठा दिवसपाळीमध्ये एक दिवसाआड होत असून रब्बी हंगामामध्ये पाणी साठा उपलब्ध असून विजेच्या अभावी पिके करपत आहेत. शेतकऱ्यांची आर्थिक नुकसान होत असून यावर उपाय म्हणून आपण उपरोक्त विषयी ट्रान्सफार्मर बसवून शेतकऱ्यांची मदत करावी .मंगरूळ सबस्टेशनवरती मंगरूळ, कुभारी, रायखेल,भाती, खोताचीवाडी, सरडेवाडी  या गावाचा समावेश होतो .

यातील काही भागामध्ये सतत वीजपुरवठा आहे. तर काही भागामध्ये एक दिवस आड वीजपुरवठा आहे. यातून सर्वाना समान वीज वितरीत करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा , या मागणीची माहितीस्तव प्रत कार्यकारी अभियंता महावितरण उस्मानाबाद,उपविभागीय अभियंता महावितरण तुळजापूर, आ. राणाजगजितसिंह पाटील तुळजापूर यांच्याकडे  मकरंद बाळासाहेब लबडे यांनी दिले

 
Top