वाशी / प्रतिनिधी-

दिनांक 25 फेब्रुवारी 2023 रोजी शाळेत इयत्ता दहावी वर्गाचा स्वयंशासन दिन व निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ऍड. सूर्यकांत सांडसे प्रमुख पाहुणे भागवतराव कवडे नगरसेवक न.पं. वाशी शाळेचे मुख्याध्यापक  लक्ष्मीकांत पवार, संस्थापक एस. एल. पवार सर उपस्थित होते.  या स्वयंशासन दिनी मुख्याध्यापक म्हणून दहावीतील अजित सुकाळे व उपमुख्याध्यापिका म्हणून शिवकन्या भराटे यांनी काम पाहिले. दिवसभरात इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी शैक्षणिक कामाचा अनुभव घेत शाळेचे वर्ग सुरळीतपणे चालू ठेवले. निरोप समारंभाच्या वेळी विद्यार्थ्यांनी आपली मनोगत व्यक्त करताना आपल्या आठवणींना उजाळा दिला. मुख्याध्यापक लक्ष्मीकांत पवार यांनी आपल्या भाषणामध्ये विद्यार्थ्यांना उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. भागवतराव कवडे यांनी सामाजिक जीवनामध्येही आपला सहभाग असला पाहिजे त्याचबरोबर आपल्या आई वडिलांच्या कष्टाची जाणीव ठेवावी असेही सांगितले. सूर्यकांत सांडशे यांनी उज्वल यशासाठी विद्यार्थ्यांना विविध उदाहरणे देऊन प्रेरणा दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  विद्यार्थिनी सुप्रिया गुंजाळ  व रेणुका थोरबोले,  प्रास्ताविक अथर्व चेडे  व उपस्थितांचे आभार प्रसाद उंदरे यानी मानले. मयुरी विधाते प्राजक्ता बावधनकर या विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त केली तसेच शिक्षिका सारिका जगताप यांनीही आपले विचार मांडले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व विद्यार्थी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले

 
Top