उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 महाराष्ट्र अॅथलेटिक्स संघटनेच्या वतीने कोल्हापूर येथे आयोजित करण्यात येणाऱ्या ८,१० व १२ वर्षाखालील  गटातील मुले व मुलींच्या राज्यस्तरीय सब- ज्युनियर स्पर्धेसाठी उस्मानाबाद ज़िल्हा अॅथलेटिक्स संघटना व क्रीडा भारती धाराशिव शाखा यांच्या वतीने जिल्हा अजिंक्यपद स्पर्धा व जिल्हा संघाची निवड चाचणी स्पर्धा श्री तुळजाभवानी क्रीडा संकुल उस्मानाबाद येथे  दि. 22 फेब्रुवारी 2023  रोजी सकाळी  9:30 वा. आयोजित करण्यात आलेली आहे. यामध्ये ८ वर्षाखालील मुले व मुलींची स्पर्धा - 50 मी ,80 मी , लांब उडी , ४५०मी शटल रिले व १० वर्षाखालील मुले व मुलींची स्पर्धा 50 मी ,100मी , लांब उडी , गोळा फेक, ४१०० मी रिले आणि १२ वर्षाखालील मुले व मुलींची स्पर्धा - 60मी , 200मी , उंच उडी , लांब उडी , गोळा फेक, ४१०० मी रिले* या स्पर्धा होणार आहेत यास्पर्धेमधून विजयी खेळाडू  मुले व मुलींची निवड उस्मानाबाद जिल्हा संघात केली जाणार आहे.खेळाडूंनी सोबत आधार कार्ड ,जल्म दाखला(नगरपालिका/ग्रामपंचायत), २ पासपोर्ट साइज फोटो सोबत आणावे.

या लिंक वर नोंदणी करावी

https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSeHU4y7G8uC7Om3CeWmbcLMuvzc7cjOOajcssYgN-Kr5iFO2g/viewform?usp=pp_url

 08 वर्ष - 12 /02/2015 ते 11/02/2017

10 वर्ष- 12/02/2013 ते 11/02/2015

12 वर्ष-12/02/2011 ते 11/02/2013 दरम्यान जन्मदिनांक असणारे सहभागी होऊ शकतात.अर्ज करण्याची अंतिम दिनांक 18/02/2023

यासाठी राजेंद्र सोलनकर यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे त्यामध्ये सदस्य म्हणून सुरेंद्र वाले, मुनीर शेख ,राजेश बिलकुले,ज्ञानेश्वर भुतेकर,सचिन पाटील,रोहित सुरवसे,ऋषिकेश काळे,गणेश मुळे,प्रिया घोडके यांची निवड करण्यात आली आहे.स्पर्धा प्रमुख म्हणून संजय कोथळीकर ,अजिंक्य वराळे यांची निवड करण्यात आली आहे या अजिंक्य पद स्पर्धा व निवड चाचणी मध्ये अधिकाधिक खेळाडुनी सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हा संघटनेचे अध्यक्ष भरत जगताप व सचिव योगेश थोरबोले यांनी केले आहे . अधिक माहितीसाठी माऊली भुतेकर (9404193674), रोहित सुरवसे (7796756866) यांच्याशी संपर्क साधावा.


 
Top