कळंब / प्रतिनिधी- 

 कळंब  येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची २३८०० स्क्वेअर फुटाची कोलाज पेंटिंग   कळंब शहरात झाली असून आणखी एक विश्वविक्रमाची नोंद होणार आहे.

संपूर्ण राज्यात गाजलेल्या कळंब येथील शिवजयंतीची सध्या जोमात तयारी सुरू असून संपूर्ण शहर झेंडे - पताकांनी सजून शिवमय झाले आहे. यंदा या सोहळ्यात छत्रपती शिवाजी महाराज यांची भव्य प्रतिमा भर पाडणार असून देशपातळीवरील रेकॉर्ड करणारी तब्बल २३८०० स्क्वेअर फुट कोलाज पेंटिंग  काढण्यात आली आहे.

कळंब येथील श्रीमंतयोगी युवा मंचाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त महाराजांची २३८०० स्वे.फूट आकाराची  कोलाज पेंटिंग साकारण्यात  आली असून याचा विश्वविक्रम होणार आहे.२०१८ साली या युवा मंचाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची १९२०० स्वे.फुटाची रांगोळी साकारण्यात आली होती.अगदी तसेच पण थोडी वेगळी प्रतिमा आकारून कळंब शहराचे नाव अजून एकदा देशात गाजनार आहे.या उपक्रमासाठी श्रीमंतयोगी युवा मंचाचे मुख्य मागर्दशक मा.नगराध्यक्ष पांडुरंग कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली  मंचाचे संस्थापक अध्यक्ष राहुल कुंभार  यांनी हा उपक्रम राबविला आहे.ही कलाकार राजकुमार कुंभार यांची  १६ व्या विक्रमाची कलाकृती आहे.


 
Top