उस्मानाबाद / प्रतिनिधी-

डॉ.पदमसिंहजी पाटील व आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा जनसेवा केंद्र, तेरणा सुपर स्पेशालिटी हॉस्पीटल, नेरुळ नवी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य तपासणी व उपचार शिबाराचे आयोजन मंगळवार दि.०७ फेब्रुवारी २०२३ रोजी, किल्ला गेट परिसर, नळदुर्ग ता. तुळजापूर येथे सकाळी १०:०० ते ४:०० या वेळेत करण्यात आले होते. या आरोग्य शिबीरात प्रभाग नळदुर्ग व परिसरातील सर्व वयोगटातील ७११ महिला, पुरुष तसेच बालकांनी लाभ घेतला. यात प्रामुख्याने ह्रदयरोग, स्त्रीरोग, कान-नाक घसा, नेत्ररोग, बालरोग, अस्थिरोग या सह विविध आजारांवर मुंबई येथील तज्ञ डॉक्टरांनी तपासणी व उपचार केले व मोफत औषधाचा पुरवठा करण्यात आला.

 कार्यक्रमाचे उद्घाटन सिध्देश्वर गोरे (पोलीस निरीक्षक नळदुर्ग), माजी नगराध्यक्ष नय्यर जहागीरदार भाजपा शहराध्यक्ष धिमाजी घुगे यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रमुख पाहुणे पदमाकर घोडके, युवा नेते गौस शेख, संजय जाधव, विलास येडगे, सलीम (पुढारी) बागवान, एस.के.बागवान, रियाज शेख, मोईन काझी, उमर बागवान, आसेम काझी कार्यकर्त्या व ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थीत होते. यावेळी मुंबईचे डॉ.अजित निळे, डॉ. दिपक बाराते, डॉ. अजय घुगे, डॉ. उन्नती वाटल, डॉ.कौस्तुब केळकर, डॉ. विनायक कोकणे, डॉ.निया पाटील, यांनी रुग्णांची तपासणी करुन औषधोपचार केले. तसेच तेरणा जनसेवा केंद्राचे अबुल हसन रझवी, अमीन सय्यद, विनोद ओहळ, संदिप खाचरे, सचिन व्हटकर, पवन वाघमारे यांनी परीश्रम घेतले.

 

 
Top