तुळजापूर / प्रतिनिधी-

 पंढरपूर येथील माजी नगरसेवक विठ्ठल शेट्टी धोञे यांनी शुक्रवार दि.१०रोजी श्रीतुळजाभवानी  मातेस पाच तोळे सोन्याचा लक्ष्मी  हार अर्पण केला .

 सुवर्णलक्षमी हार अर्पण केल्यानंतर श्रीतुळजाभवानी मंदीर संस्थानच्या वतीने सहाय्यक धार्मीक व्यवस्थापक विश्वास परमेश्वर कदम यांनी विठ्ठल धोञे परिवाराचा देविची प्रतिमा  महावस्ञ देवुन यथोचित  सन्मान केला.  यावेळी  धोञे यांचे पारंपारिक पुजारी श्रीकांत केशव कदम,  पञकार  प्रदीप अमृतराव,  पंढरपूरचे माजी उपनगराध्यक्ष सुधीर धोञे, संतोष धोञे , मंदीराचे तिरुपती वाघे उपस्थितीत होते.


 
Top