नळदुर्ग  / प्रतिनिधी- 

 ऐतिहासिक नळदुर्ग शहरात दि.२१ फेब्रुवारी रोजी हुतात्मा दिन साजरा करण्यात आला. यावेळी चावडी चौकात झालेल्या मुख्य कार्यक्रमात हुतात्म्यांच्या प्रतिमेचे पुजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले.

       सालाबादप्रमाणे याहीवर्षी नळदुर्ग येथे दि.२१ फेब्रुवारी रोजी हुतात्मा दिन साजरा करण्यात आला. निजामाच्या जोखडातुन मराठवाडा मुक्त करण्यासाठी झालेल्या मराठवाडा मुक्ती संग्राम आंदोलनात ऐतिहासिक नळदुर्ग शहराचे योगदान फार मोठे आहे. नळदुर्ग दोन सुपुत्र हुतात्मा बाबुराव बोरगावकर व हुतात्मा निलय्या स्वामी यांनी नळदुर्गच्या ऐतिहासिक किल्ल्याला साक्षी ठेऊन हौतात्म्य पत्कारले. निजामाने पोसलेल्या रजाकारांनी केलेल्या सशस्त्र हल्ल्यात दि.२७ फेब्रुवारी १९४८ रोजी हुतात्मा झाले तेंव्हापासुन या दोन हुतात्म्यांच्या स्मरणार्थ नळदुर्ग शहरात हुतात्मा दिन साजरा केला जातो. यावर्षी दि.२१ फेब्रुवारी रोजी नळदुर्ग शहरात हुतात्मा दिन साजरा करण्यात आला. चावडी चौकात झालेल्या मुख्य कार्यक्रमात हुतात्मापुत्र बाबुराव स्वामी, जेष्ठ नागरीक शिवाजीराव मोरे, खंडप्पा कोरे यांच्या हस्ते हुतात्म्यांच्या प्रतिमेचे पुजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी माजी नगरसेवक संजय बताले, नितीन कासार, बसवराज धरणे, विनायक अहंकारी, सुधीर हजारे, तुळजापुर तालुका महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा सुभद्राताई मुळे, व्यापारी मंडळाचे सतीश पुदाले,सुभाष कोरे, सुधीर पाटील,सामाजिक कार्यकर्ते संजय विठ्ठल जाधव,शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष सुहास येडगे, पत्रकार विलास येडगे, तानाजी जाधव, उत्तम बनजगोळे, सामाजिक कार्यकर्ते अमर भाळे,मारुती खारवे, सोसायटीचे संचालक रघुनाथ नागणे,संजय दशरथ जाधव, आप्पासाहेब स्वामी यांच्यासह हुतात्माप्रेमी नागरीक उपस्थित होते. यावेळी हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

         यानंतर हुतात्मा स्मारक येथे नगरपालिकेच्या वतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात मुख्याधिकारी लक्ष्मण कुंभार यांच्या हस्ते हुतात्म्यांच्या प्रतिमेचे पुजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी माजी नगरसेवक संजय बताले, शिवाजीराव वऱ्हाडे, पत्रकार विलास येडगे, सोसायटीचे संचालक रघुनाथ नागणे,सामाजिक कार्यकर्ते संजय विठ्ठल जाधव, मारुती खारवे, नगरपालिकेचे कार्यालयीन अधीक्षक अजय काकडे, मुनिर शेख आदीजन उपस्थित होते.

      नळदुर्ग येथील कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात उभारण्यात आलेल्या हुतात्म्यांच्या पुतळ्यांना राज्याचे माजी मंत्री व बालाघाट शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मधुकरराव चव्हाण यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी माजी नगरसेवक बालाघाट शिक्षण संस्थेचे संचालक शहेबाज काजी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.संजय कोरेकर, बालाघाट शिक्षण संस्थेचे संचालक रामचंद्र आलुरे यांच्यासह प्राध्यापक व नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top