उमरगा/प्रतिनिधी 

 आपल्या समोरचा माणूस उपाशी असेल तर त्याला आपली अर्धी भाकर देणे ही आपली संस्कृती आहे. अडचणीत असलेल्या माणसाना मदत करणे हीच खरी ईश्वरसेवा आहे. समाजातील निराधार एकल महिलांना शासनाकडून मिळणाऱ्या बाराशे रुपयांत कांहीच भागत नाही म्हणून त्यांना किमान पाच हजार रूपये मानधन देण्यात यावे अशी मागणी महामहिम राष्ट्रपती यांच्या कडे करणार आहे अशी माहिती खासदार ओमप्रकाश राजेंनिबाळकर यांनी दिली.

शहरातील अंतुबळी सांस्कृतिक सभागृहात  मिशन वात्सल्य समिती व कोरोना एकल महिलां पुनर्वसन समितीच्या वतीने संजय गांधी निराधार योजनेच्या लाभधारकाना मंजुरी आदेशाचे वाटप शुक्रवारी (दि.१७) रोजी करण्यात आले या वेळी ते बोलत होते.

 या कार्यक्रमास मिटकॉन अधिकारी व्ही. टी. चव्हाण, एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी देवानंद वाघ, पालिकेचे मुख्याधिकारी रामकृष्ण जाधवर, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे बाबुराव शहापुरे, सुधाकर पाटील, जिल्हा समन्वयक विजय काका जाधव,पंकज कुलकर्णी, विजय तळभोगे, इस्माईल शेख,आदींची उपस्थिती होती.

पुढे बोलताना खासदार ओमप्रकाश राजेंनीबाळकर म्हणाले की,समाजात पुण्याचे काम करणारी माणसे अनेक आहेत. एकल महिलांच्या अनेक समस्या असून त्या सोबविण्यासाठी या ठिकाणची समिती आणि तिचे समन्वयका विजय जाधव काका हे स्तुत्य काम करीत आहेत. आपण सर्वजण त्यामुळे लाभधारक झालात. निराधार महिलांनी कोणत्याही दलाला कडे कामासाठी पैसे देऊ नये असा सल्ला दिला. या वेळी विधवा एकल महिलां धोंडबाई माने, मल्लामा जमादार, शकिनाबी मुजावर, तारामती पांचाळ, व दिव्यांग मधून रजनी कांबळे, ऐश्वर्या सगर यांना मंजुरी आदेशाचे वाटप करण्यात आले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी विधवा महिलेच्या हस्ते सावित्रीबाई फुले व जिजाऊ मॉं साहेब यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीपप्रज्वलन करण्यात आले. प्रस्तावित विजय काका जाधव यांनी केले विजय तळभोगे,भैरवनाथ कानडे यांनी मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. भैरवनाथ कानडे यांनी केले तर विजय तळभोगे यांनी आभार मानले. 

 
Top