तुळजापूर  / प्रतिनिधी-

तालुक्यातील आपसिंगा  विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या चेअरमन पदी  कुबेर पवार व व्हाईस चेअरमनपदी उत्तम गोरे यांची निवड झाली. 

  आपसिंगा विविध कार्यकारी सेवा सोसायटी ची निवड प्रकिया दिनांक 8/2/2023 रोजी सोसायटी कार्यालयात पार पडली सभेसाठी 13पैकी  12 संचालक उपस्थित होते चेअरमन पदासाठी  कुबेर विश्वनाथ पवार व  अण्णासाहेब रामकृष्ण राऊत  यांचे अर्ज दाखल केले श्री कुबेर पवार यांना 11 मते मिळाली व व्हाईस चेअरमन पदासाठी  उत्तम शंकर गोरे यांचा एकमेव अर्ज दाखल केला चेअरमनपदी  कुबेर पवार व व्हाइस चेअरमन पदी  उत्तम गोरे यांची निवड करण्यात आली निवडणूक अधिकारी म्हणून श्री बोंदर व सचिव श्री बामणे यांनी काम पाहिले. 

नवनिर्वाचीत चेअरमन व व्हा चेअरमन याची निवड होताच त्यांच्या समर्थकानी आनंदोत्सव साजरा केला.


 
Top