उस्मानाबाद / प्रतिनिधी-

शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांना बळ मिळून राज्यात पुन्हा शिवसेनेचे सरकार स्थापन व्हावे यासाठी शिवसेनेचे केज तालुकाप्रमुख रत्नाकर शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या केज ते तुळजापूर दिंडीचे उस्मानाबाद येथे शिवसेनेच्या वतीने जंगी स्वागत करण्यात आले.

 केज येथून मजल दरमजल करीत तुळजापूरकडे निघालेल्या दिंडीचे रविवारी (दि.12) सकाळी उस्मानाबाद शहरात आगमन झाले. शिवसेनेचे लोकप्रिय खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आमदार कैलास घाडगे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली धाराशिव शिवसेनेच्या वतीने दिंडीमध्ये सहभागी झालेल्या शिवसैनिकांचे  पुष्पहार, फेटा घालून भव्य स्वागत करण्यात आले. यावेळी बोलताना शिवसेनेचे केज तालुकाप्रमुख रत्नाकर शिंदे यांनी केंद्र व राज्य सरकारवर कडाडून टीका करत शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांना कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेने बळ द्यावे यासाठी तुळजापूर येथे दिंडीच्या माध्यमातून देवीचरणी साकडे घालणार असल्याचे सांगितले. यावेळी शिवसैनिकांनी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या विजयाच्या घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला.

 यावेळी शिवसेनेचे मा.गटनेते सोमनाथ गुरव, युवा सेनेचे शहर प्रमुख रवी वाघमारे, बाळासाहेब काकडे, गणेश खोचरे,  उपशहरप्रमुख बंडू आदरकर, पंकज पाटील, दिनेश बंडगर, अजय नाईकवाडी, विनोद केजकर, खंडू काटे, हनुमंत यादव, प्रदीप साळुंके, सागर शेरकर, राकेश जाधव, शिरीष वाघमारे,अविनाश इटकर, विठ्ठल सुरवसे,अक्षय खळदकर  यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 
Top